मिरज : प्रतिनिधी

टाकळी , ता.२२: टाकळी येथे तपोवन या ठिकाणी स्वामीजींच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते सुनील गुळवणे यांचा सत्कार करण्यात आला. बोलवाड येथील श्री वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी येथे दर पौर्णिमा दिवशी परमपूज्य श्री ज्ञान योगी सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या पादुकाचे पूजन केले जाते. तसेच दर पौर्णिमेला समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या व्यक्तीचे सन्मान केले जाते. त्याचप्रमाणे सुनील गुळवे व त्यांच्या पत्नीचा देखील सन्मान करण्यात आला.
जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समिती दिशा सांगली या कमिटी वरती अशासकीय सदस्य नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान परमपूज्य शिवदेव स्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी स्कॉलर्स पब्लिक स्कूलचे चेअरमन शिवानंद तेलसंग सर, रवींद्र फडके सर, संजय मेथे, मल्लिकार्जुन बिराजदार व सर्व भक्त मंडळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.