सांगली : प्रतिनिधी

सांगली , ता २० : आज गुरुवार दि. २०/३/२०२५ रोजी सिंगल युज प्लॅस्टिक तपासणी, जप्ती व दंडात्मक मनपा कडून कारवाई करण्यात आली. मा. शुभम गुप्ता आयुक्त यांच्या आदेशानुसार मा. उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता अधिकारी अनिल पाटील यांच्या नियंत्रणात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी यांच्या टीमने तिन्ही शहरात सिंगल युज प्लॅस्टिक तपासणी, जप्ती व दंडात्मक कारवाई केली आहे.
सदर कारवाई खालीलप्रमाणे
- प्रभाग समिती 1 कार्यक्षेत्रातील कापड पेठ, गणपती पेठ या परिसर मध्ये २३५००/- दंडात्मक कारवाई केली आहे.
- प्रभाग समिती 2 कार्यक्षेत्रातील मार्केट यार्ड व चांदणी चौक या परिसर मध्ये १५०००/- दंडात्मक कारवाई केली आहे.
- प्रभाग समिती 3 कार्यक्षेत्रातील कुपवाड गावठाण या परिसर मध्ये ३००००/- दंडात्मक कारवाई करण्यात आली
- अशी एकूण ६८५००/- इतका दंडात्मक कारवाई करून २५ किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे.

काही भागात सिंगल युज प्लॅस्टिक वापर वारंवार होत असल्याचा तक्रारी येत आहेत त्या वर कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश मा आयुक्त यांनी दिले आहेत. त्या नुसार आज ही कारवाई करण्यात आली आहे.
