सांगली : प्रतिनिधी

सांगली, ता.२० : सांगली, मिरज, कुपवाड मनपाचा नवा उपक्रम आता जन्म व मृत्यू दाखले पोस्टाद्वारे घरपोच मिळणार आहे. भारतीय पोस्ट खात्या व्दारे आता घर बसल्या मिळणार जन्म व मृत्यू दाखले, आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून ही सुविधा उपलब्ध होणार आहे, तरी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आयुक्त मा. शुभम गुप्ता यांनी सांगितले.

प्रशासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी नवीन सेवा सुरू केली आहे, ज्या अंतर्गत जन्म व मृत्यूचे दाखले थेट नागरिकांच्या घरी पोस्टाद्वारे पाठवले जाणार आहेत.
सेवा कशी मिळणार

प्रमाणपत्र तयार झाल्यावर ते भारतीय पोस्टद्वारे थेट नागरिकांच्या पत्त्यावर मिळणार आहे, नागरिकांनी जास्तीत जास्त या उपक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी केले आहे.