मिरज : प्रतिनिधी

मिरज , ता.२० : येथे नशा मुक्ती रॅली संपन्न झाली. आजच्या धकाधकीच्या युगामध्ये गांजा, चरस, अफु, कोकेन, हिरोईन, दारू अशा अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस तरुण पिढीमध्ये वाढत चालली आहे. ही तरुण पिढी व्यसनमुक्त झाली पाहिजे या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद शिक्षण विभाग,सहाय्यक सेवाभावी संस्था व न्यू इंग्लिश स्कूल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने नशा मुक्ती रॅली घेण्यात आली.
नशा मुक्ती रॅलीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.तृप्ती धोडमिसे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रॅलीला सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय? व्यसन केल्याने कोणकोणते दुष्परिणाम होतात? त्यावरती उपाय कोणकोणते आहेत याविषयी प्रश्नावली अगदी हसत खेळत विद्यार्थ्यांना सामावून घेत मार्गदर्शन व माहिती सौ. तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिली.
सांगली जिल्ह्यामध्ये ड्रग्सचे सेवन करण्याचे प्रमाण व त्याचा साठाही खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहे.
त्यामुळे त्याच्यावर आळा घालण्यासाठी बातमी व तरुण पिढी व्यसनमुक्त झाली पाहिजे. त्यासाठी सहाय्यक सेवाभावी संस्थेमार्फत संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये मोबाईल व्हॅन द्वारे जनजागृती करण्यात येत आहे. न्यू इंग्लिश स्कूल मिरज शाळेच्या वतीने उत्कृष्ट असे व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आले.
सदर नशा मुक्ती रॅलीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिसे मॅडम,माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी श्री रामचंद्र टोणे, तंबाखूमुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक व सहाय्यक सेवाभावी संस्थेचे (अध्यक्ष ) श्री रवींद्र कांबळे, न्यू इंग्लिश स्कूलचे पदाधिकारी श्री दिग्विजय श्री जावेद जमादार, मुख्याध्यापक श्री अरुण माने, शिक्षक नचिकेत भोई, माधुरी जाधव, तंबाखूमुक्त शाळेचे जिल्हा समन्वयक सौ.ज्योती राजमाने, सहाय्यक सेवाभावी संस्थेकडून पोपट कांबळे, गंगाराम कांबळे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.