कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड , ता.२८: सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगली, कृष्णा व्हॅली चेंबर भारती हॉस्पिटल दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक वसाहतीमधील कामगार व त्यांच्या कुटुंबियासाठी महाआरोग्य शिबीर पार पडले. सदर महाआरोग्य शिबीरामध्ये औद्योगिक वसाहतीमधील २०४ कामगारांनी सहभाग नोंदविला. सदर शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सांगलीचे धर्मादाय उपायुक्त डॉ. मनीष पवार, सहा. धर्मादाय आयुक्त प्रियांगिनी पाटील, धर्मादाय निरीक्षक सचिन पाटील, भारती हॉस्पीटलच्या मुख्य अधिष्ठाता डॉ. सारा धनवडे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजित जोशी, श्वेता कुलकर्णी तोडकर सर यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये अस्थिरोग, वैदक शास्त्र, नेत्ररोग, दंत रोग, स्त्रीरोग, होमिओपॅथी आयुर्वेदिक शल्यचिकित्सा व्यसन मुक्तीवरील उपचार, कर्करोग इत्यादी विभागाकडून येणाऱ्या लाभार्थीं यांना उपचार व ओषध देण्यात आले. कामगारांना धनुर्वातीची लस, व स्त्रियांना अंटी कॅन्सर ची लस हि देण्यात आली.
सदर शिबिराठी जिल्ह्यातील ९ हॉस्पीटल नि सहभाग नोंदविला. शिबीर पार पाडण्यासाठी भारती हॉस्पिटलचे गणेश यादव डॉ. अभिषेख हळीगळे, कृष्णा व्हॅली चेंबर व्यवस्थापक अमोल पाटील, भारतीचे अभिजित भिसे माया स्वॉमी आणि स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.