
तासगाव- गणपती पंचायतन ट्रस्टी चा वतीने ९९ वर्षांचा करारावर जमीनी लिलाव करणाचे जाहीर केले. असे झाल्यास अनेक शेतकरी यांना भूमी हीन होतील.देश स्वतंत्र नंतर सर्व संस्थान विलीन झाल्या. खाजगी संस्थान तसाच राहिल्या. त्यामुळे राहिलेले खाजगी संस्थानी असणारी जमीन ट्रस्ट ऑक्टनुसार नोंद करून शेतकऱ्यांना खंडाने दिली.परंतु ९९वर्षाचा करार लिलाव करण्याचा निर्णय घेतला. सात बारावर देव स्थान इनाम वर्ग तीन अशी नोंद आहे . शेतकऱ्यांची सुरक्षित कुळ म्हणून नोंद होती पण मागील काही वर्षापासून ही नावे कमी करण्यात आली असून कोणत्याही शेतकऱ्याचे नावे उताऱ्यावर नाही.या गोष्टीची संधी साधत गणपती पंचायतन ट्रस्ट जमिनी ९९वर्षाचा करारावर लिलाव करण्याचे जाहीर केले. असे झाले तर शेतकरी भूमीहीन होतील त्यांचा अनेक वर्षांचा मेहनितीला व कसरीतीला न्याय मिळणार नाही . त्याची नावे परत सात बारा मध्ये नोंद करावी . व ट्रस्टीची लिलाव प्रक्रिया बंद करून गणपती पंचायतन ट्रस्टीवर योग्य ती कारवाई करावी असे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले निवेदन देताना जिल्हाअध्यक्ष रमेश पाटील ,सचिन गुलाब मुलानी आणि शेतकरी होते