
काही वेळीपूर्वीच सुमारे रात्री दहाच्या सुमारास विश्रामबाग अन मिरज पोलिस ठाण्यात सांगली मिरज रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीच्या फोनने सारी यंत्रणा खडबडून जागी झाली. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, राखीव दलाचे पोलिस, अग्निशमन यंत्रणा यांना वायरलेसवरून कॉल देण्यात आला. रेल्वे पोलिसही सोबत होते. अवघ्या काही मिनिटात सगळी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांचा इतका मोठा फौजफाटा पाहून प्रवाशांमध्ये ही घबराट पसरली. या सगळ्या परिस्थितीत पोलिसांची यंत्रणा सतर्क आणि वेळेत घटनास्थळी दाखल झाली याचा अभिमान साऱ्यांना वाटला आणि पोलिसांचे ‘मॉक ड्रिल’ यशस्वी झाले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली आज मॉक ड्रिल घेण्यात आले.