
सांगली- रेल्वेत विनापरवाना फिरून विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्याचे सत्र रेल्वे पोलिसांनी चालू केली.२७ एप्रिल २०२४ पासून सुरु केलेल्या या कारवाईत विभागात येणारे शहरे पुणे, दौंड, मिरज, सातारा, अहमदनगर, कोपरगाव, बेलापूर आदी प्रमुख स्थानके आणि प्रवासी गाड्यांमध्ये कारवाया झाल्या. अनधिकृत ब्रँडचे पॅकिंग केलेले पिण्याचे पाणी,
.पाण्याच्या १९ हजार बाटल्या जप्त.
विभागीय व्यवस्थापक इन्दू दुबे, अतिरिक्त व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या आदेशानुसार ही मोहिम पार केली.
५६० विनापरवाना विक्रेत्यांना पकडण्यात आले. त्यापैकी ३५१ विक्रेत्यांस न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडून दंडाची वसुली करण्यात आली.