
खटाव, ता.२२ : मिरज तालुक्यातील खटाव गावात पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील ८७ लाभार्थ्यांना खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या हस्ते मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले. शनिवार (ता.२२) महाराष्ट्र शासनाने महत्त्वकांक्षी महा आवास योजना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन अनुसार खटाव गावासाठी मंजूर झालेल्या ८७ घरकुलांच्या लाभार्थ्यांकरिता मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यशाळा व पहिला हप्ता वितरण आणि मंजुरी आदेश प्रदान कार्यक्रम यानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर ग्रामसभेवेळी घरकुल लाभार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता श्री ऋषभ पाटील साहेब हे उपस्थित होते. त्याच पद्धतीने खटाव गावचे यापूर्वीचे सर्व सरपंच सर्व पंचायत समिती सदस्य यांना या कार्यक्रमानिमित्त विशेष ग्रामसभेला आमंत्रित करण्यात आलेल होते. गावातील सर्व ८७ लाभार्थी या ग्रामसभेसाठी उपस्थित होते. लाभार्थ्यांना आपापली घर लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याबाबत ग्रामपंचायत मार्फत आवाहन करण्यात आलेला आहे. खटाव गावची एकूण प्रतीक्षा यादी घरकुलासाठी २५० लाभार्थ्यांची आहे. उर्वरित सुमारे दीडशे लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी मिळणे कामी पाठपुरावा सुरू आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड माजी सरपंच सुजाता होनांनावर सदस्य संजय कागवाडे गणपती होनमोरे संभा पारोजी लाभार्थी उपस्थित होते.