
सांगली, ता.२० : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून छत्रपती शिवरायांना वंदन ; जय छत्रपती शिवाजी जय भारत पदयात्रेत हजारो शासकीय सेवकांनी सहभाग घेतला. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना वंदन करण्यात आले. प्रारंभी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत वंदन करण्यात आलं. यानंतर आयुक्त शुभम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या हस्ते तसेच अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण यांनी राज्यगीत सादर केले. तसेच स्वच्छतादूत सतीश दुधाळ व अन्य स्वच्छता कर्मचारी यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी जलनिस्सारण अभियंता चिदानंद कुरणे, उद्यान अधीक्षक गिरीश पाठक, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद, नगर अभियंता परमेश्वर अलकुडे , प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मिरज आणि कुपवाड विभागीय कार्यालय येथे देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस उप आयुक्त विजया यादव व सहा आयुक्त अनिस मुल्ला, सचिन सांगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत वंदन करण्यात आलं. या वेळी विभागीय कार्यालय मधील सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान शासनाने जाहीर केलेल्या जय छत्रपती शिवाजी जय भारत या पदयात्रेत महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांनी विशेष सहभाग घेतला होता. तसेच महापालिकेकडून ठिकठिकाणी पदयात्रेत सहभागी सर्वांना पाण्याचे वाटपही करण्यात आले.