
जत : प्रतिनिधी
जत, ता.२५ : खलाटी बस स्टॉपजवळ विना परवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तरुणास अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहे. विश्वजित रामचंद्र पाटील, वय २२ वर्षे, रा. पाटील वस्ती, कुडणूर, ता. जत, जि सांगली ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ५० हजार २०० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. सदर कारवाई सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शनिवार (ता.२२) केली असून त्याच्यावर जत पोलीसांत गु.र.न. १३२/२०२५, आर्म ॲक्ट ३,२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने जत तालुक्यातिल खलाटी येथे सपोनि/ पंकज पवार त्यांचे पथक जत विभागात पेट्रोलिंग करत असताना त्यांचे पथकातील पोशि/केरूबा चव्हाण यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खलाटी गावचे बस स्टॉपजवळ एक इसम अवैध अग्निशस्त्र विक्री करीता येणार असल्याचे त्या मिळालेल्या माहितीने खलाटी गावचे बस स्टॉपजवळ सापळा रचून बस स्टॉपचे शेडलगत एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला असता त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विश्वजीत पाटील असे असल्याचे सांगितले. विश्वजीत अंगझडतीचा घेतली असता, त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५० हजार २०० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले. हस्तगत केलेल्या मुद्देमाल व संशयित आरोपीला पुढील तपास कामी जत पोलीसांत पाठविण्यात आले आहे अधिक तपास जत पोलीस करीत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पचार, स्था. गु. अ. शाखा, पोहवा सतिश माने, मच्छिंद्र बर्डे, नागेश खरात, द-याप्पा बंडगर, सागर लवटे, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, संदिप गुरव, अमर नरळे, महादेव नागणे, शिवाजी सिद, पोना / सोमनाथ गुंडे, संदिप नलावडे, उदय माळी, पोशि / केरूबा चव्हाण, विक्रम खोत यांनी केली आहे.