
आरग ता.१३: येथे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले. आरगमध्ये तहसीलदार कार्यालय मिरज यांच्याकडून पारदर्शक गतिमान लोकविभूक प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी आज शंभर दिवसाचा विशेष कृती कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन गतिमान अभियान कार्यक्रमांतर्गत लक्ष्मी मुक्ती योजना प्रलंबित फेरफार ॲग्रीस्टॅक पानंद रस्ते खुला करणे विविध दाखल्यांचे वाटप करण्यासंबंधी आरग मध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी खटाव, लिंगनूर, बेळंकी, शिंदेवाडी, आरग येथील लोकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. प्रांताधिकारी यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले व
प्रांताधिकारी यांच्या सत्कार आरग मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्री. उत्तम दिघे (प्रांताधिकारी) आशिष सानप (निवासीनायब तहसीलदार),
श्री. जमदाडे (महसूल नायब तहसीलदार), परशराम ओमासे (मंडळ अधिकारी आरग ) कमलाकर कदम (ग्राम महसूल अधिकारी आरग) श्री संदिप सोपान साळुंखे (ग्राममहसूल अधिकारी खटाव) श्री सुरेश कगुडे (ग्राममहसूल अधिकारी लिंगनूर), श्रीमती अश्विनी माने (ग्राम महसूल अधिकारी संतोषवाड), आरग सरपंच कोरबू मॅडम, लिंगनूर सरपंच मारुती पाटील उपस्थित होते.