
सांगली : प्रतिनिधी
सांगली, ता.१४ : विशिष्ट सण, उत्सव, समारंभासाठी शासनाने ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभाग शासन निर्णय दिनांक ५ सप्टेंबर २०१६ व दिनांक २२ ऑगस्ट २०१७ नुसार ही सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार ध्वनीची विहित मर्यादा राखून कार्यक्रमासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सवलत देण्याकामी राज्य शासनाने संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. प्रशासनामार्फत पुढील नमुद सणांसाठी ध्वनीमर्यादा सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलतीचे आदेश जारी केले आहेत.

घोषित शांतता क्षेत्रामध्ये ध्वनी प्रदूषणांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये आयुक्त, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली व पोलीस अधीक्षक सांगली आणि ग्रामिण व शहरी भागामध्ये उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांना प्राधिकृत केले असल्याचे आदेशात म्हटले आहे.