
मिरज ता. १३ : वडडी लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्यासह नऊ सदस्य भारतीय जनता पार्टीला राम राम ठोकणार आसल्याचे आज वडडी येथे झालेल्या बैठकीत सांगितले. २०२२ पासून भारतीय जनता पार्टीला लोकसभा विधानसभेला वडडी गावातून लीड देत आलो आहोत. तरीही भारतीय जनता पार्टी करून निधी मिळत नाही असा आरोप नऊ सदस्य व सरपंच यांनी भारतीय जनता पार्टीला सोडण्याचा निर्णय व गावच्या विकासासाठी इतर पक्षात जाणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत घेतल्याचे सांगितले.
माझी कामगार मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी वडी गावाला विकासापासून वंचित ठेवले आहे. वडडी गावाला म्हणावं तसा निधी दिला नाही त्यामुळे आम्ही गावचा विकास कसा करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. गावच्या विकासासाठी आम्ही सर्व सदस्य व सरपंच यांनी भारतीय जनता पार्टी सोडून इतर पक्षात जाऊन काम करणार आहे.
https://youtube.com/shorts/wX3Q5Lf81_4? si=21cmpYKE6H9zDaAh
गावातील लोकहितांच्या योजना पूर्ण व्हाव्यात संपूर्ण गावचा विकास व्हावा यासाठी पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.