सांगली : प्रतिनिधी

सांगली ता.२ : ‘जीबीएस’ आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज, नागरिकांनी घाबरून जावू नये असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले (GBS) गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराच्या रूग्णांवर यापूर्वीही उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.


यावेळी जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ आदि उपस्थित होते.