सांगली : प्रतिनिधी

सांगली ता.१ : चेन स्नाचिंग करणाऱ्या आंतरराज्यीय सराईतास जेलबंद करून त्याच्याकडून ४ लाख ६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालमध्ये ३,४१,७००/- रु. सोन्याचे मंगळसूत्र, साखळी, माळ आणि घंटानाद व ६५,०००/-रु. किंमतीची दुचाकी असा हा एकूण चार लाख सहा हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनी केली असून मेहंदी हसन अक्रम अली सय्यद, वय ३८वर्षे, रा. चिद्रीरोड हुशेणी कॉलनी, चदरी, बिदर, राज्य-कर्नाटज असे जेलबंद केलेल्या सराईताचे नाव आहे.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार मालमत्तेविरुद्धचे गुन्हे व चेन स्नाचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले. त्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहा.पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्याकडील एक पथकाची नियुक्त केली. मालमत्तेचे गुन्हे उघडकिस आणण्याच्या अनुषंगाने पथक पेट्रोलिंग करत असताना पथकाला बातमीदारांकडून बातमी मिळाली की, मेहंदी हसन अक्रम अली सय्यद हा चोरी केलेले दागिने विक्रीसाठी दुचाकीवरून सांगली सूतगिरणी चौक ते कुपवाड रोड या परिसरात येणार असल्याचे त्या दिलेल्या माहितीने सहा.पोलीस निरीक्षक पंकज पवार त्यांचे पथक यांनी दिलेल्या ठिकाणी सापळा रचून विक्रीस आलेल्या सराईतास ताब्यात घेतले. त्याच्या कब्जातील सोन्याचे ऐवज जप्त करून सदर मालाची चौकशी केली असता, सदर ऐवज हा चोरीचा असून सांगली त्रिकोणी बागजवळ, नागराज कॉलनी, मिरज येथील अंबाबाई रेसिडेन्सी समोरून व पोस्ट ऑफिस मिरज येथून महिलेच्या गळ्यातून चोरल्याचे कबूल केले. याबाबत मिरज पोलीस ठाणे व विश्रामबाग ठाण्यात गुन्हा नोंद आहे. सदर संशयित हा रेकॉर्डवरील असून या यापूर्वी त्याच्यावर मुंबई कर्नाटक येथे चेन स्नॅचिंग व मोबाईल चोरीचे गुन्हे आहेत. पुढील तपासकामी सराईत व मुद्देमाल विश्रामबाग पोलीस ठाण्याचा ताब्यात देण्यात आले. अधिक तपास विश्रामबाग पोलीस, सांगली हे करीत आहे.
सदर कारवाई सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार, सागर लवटे, महादेव नागणे, संदिप गुरव, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, अमर नरळे, नागेश खरात, द-याप्पा बंडगर, सतिश माने, मछिंद्र बर्डे, संदिप नलावडे, उदय माळी, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली.