
मल्लेवाडी तालुका मिरज येथील गट क्रमांक 491/2 मधील जमिनी खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांचे बोगस नावे दाखवून गुंठेवारीची जमीन खरेदी करण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशीबाबत प्रांताधिकारींना भेटून सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी निवेदनाद्वारे परशुराम बनसोडे यांनी केले आहे.
याप्रकरणी मिळाले अधिक माहिती अशी की, मल्लेवाडी तालुका मिरज येथील जमीन खरेदी करताना शेतकऱ्यांचे बोगस नावे दाखवून जमीन खरेदी करण्यात आले आहे. सदर ठिकाणी प्लॉटिंग करून गुंठेवारी द्वारे विक्री करण्याचे काम सुरू आहे. सदर बेकायदेशीर दस्त रद्द करावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीर्व स्वरूपाचे आंदोलन छेडण्याच्या इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी केला. खरेदी केलेला दस्त तातडीने रद्द करावा अन्यथा येणाऱ्या बुधवारपासून प्रांत अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला आहे. प्रांताधिकारी यांना या संबंधित पुरावे सादर करण्यात आले आहे.