
विवाहानंतर एका वर्षाच्याआत घटस्फोट घेता येणार नाही. वर्षभराच्या नातं मोडू शकत नाही, असे एका निकालाचयवेळी अलाहबाद उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दोन्ही पक्षाची परस्पर सहमती असली तरीही नातं मोडता येणार नाही, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १४ नुसार, अतित्रास किंवा अनैतिक कारणे असल्याशिवाय विवाह मोडता येऊ शकत नाही. कायद्याने मान्यता दिलेल्या कारणांसाठीच ते वेगळे होऊ शकतात, असं खंडपीठानं स्पष्ट केलं. हिंदू जोडप्याने घटस्फोट क्षुल्लक कारणावरून घेऊ नये, असे न्यायमुर्ती अश्विनी कुमार मिश्रा आणि डी. रमेश यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालय, सहारनपूरच्या निर्णयाला आव्हान देणारं अपील फेटाळताना हा आदेश दिला आहे.