
किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवले. प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान, किन्नर आखाड्याने एक मोठी कारवाई केली असून तिला आखाड्यातूनही बाहेर काढले आहे. याशिवाय, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वरपदावरून हटवले आहे. लवकरच एक नवीन आचार्य महामंडलेश्वर मिळेल व आखाड्याची नव्याने पुनर्रचना करण्यात येईल, असे ऋषी अजय दास यांनी सांगितले.