कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड, ता.३० : कुपवाड एमआयडीसी मधील एका कारखान्यात जेवण बनवण्याच्या किरकोळ कारणावरून मंगळवार (ता.२८) रात्रीचा सुमारास परप्रांतीय मजुराचा खून करण्यात आला. या खून प्रकरणी आणखी एका संशयित आरोपीचे नाव समोर आले असून त्याला कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव अजय कुमार पटेल रा. काननवाडी, सरगर सद्या राहणार लक्ष्मी इडीस्ट्रिज कुपवाड एमआयडीसी, कुपवाड असे आहे.

पोलिसांच्या तपासा दरम्यान तिसऱ्या संशयित आरोपीचे नाव समोर आले आहे. संशयित आरोपी अजय पटेल, वैभव कांबळे, चिदानंद खोत या तिघांकडून लाकडी दांडक्याने मारहाण करून सहकारी इंद्रिस यादव या २३ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. मृत इद्रिस यादव व संशयित आरोपी वैभव कांबळे, चिदानंद खोत आणि अजय पटेल हे चौघेजण एकाच कारखान्यात फॅब्रिकेशन कामासाठी आले होते. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.
