
बुधगाव, ता.२९ : ग्रामपंचायतमध्ये गेले दहा दिवसांपासून बुधगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी नाही. बुधगाव तत्कालीन ग्रामसेवक अधिकारी सौ. कल्पना अर्जुनदास राठोड यांची पंचायत समिती वरून बदली झाल्याचे समजून आल्याने त्वरित बुधगावाला सक्षम ग्रामविकास अधिकारी यांची नेमणूक करावी यासाठी बुधगाव पंचायतच्या वतीने आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली तसेच माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती मिरज यांना बुधगाव ग्रामपंचायतच्या वतीने आज निवेदन देण्यात आले.
या निवेदनात बुधगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी नसल्याने गेले दहा दिवसांपासून बुधगावतील नागरिकांचे कामे रखडली आहेत. ग्रामपंचायत मधील कारभारात अडथळा येत आहे.२६ जानेवारीच्या ग्रामसभा व मासिक सभा घेण्यात अडथाळा निर्माण होत असल्याने या निवेदनाची दखल घेऊन बुधगाव ग्रामपंचायतीस सक्षम ग्रामविकास अधिकारी यांची नेमणूक करावी असे म्हंटले आहे.
यावेळी बुधगावच्या सरपंच सौ वैशाली विक्रम पाटील व ग्रामपंचायत सदस्या सौ जयश्रीताई पाटील आदी उपस्थित होते.