
सांगली, ता.२८ : नरवाड गावास सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांनी सदीच्छ भेट दिली. सोसायटी चे नूतन चेअरमन महेश कांबळे व नूतन व्हा.चेअरमन सौ.लता तानाजी कोळी यांचा सत्कार केला तसेच विकास सोसायटी मध्ये नव्याने उभारलेल्या सोलार पॅनेल चे उदघाटन सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास सोसायटी हॉल मध्ये उपस्थित गावातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्या विविध अडीअडचणी जाणून घेतल्या. नरवाड ग्रामपंचायत कार्यालय, सरपंच व सदस्य यांच्यावतीने सत्कार करण्यात आला व विकास कामांबाबत चर्चा करून निवेदन स्वीकारले. रेल्वे भुयारी मार्गावरील रखडलेल्या माळेवाडी, कागवाड रस्त्याची शेतकरी व ग्रामस्थ यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करून रेल्वे प्रशासनास पाठपुरावा करणेबाबत आश्वस्त केले. नुकतेच दुःखद निधन झालेले ज्येष्ठ नेते स्व.कुमार आण्णा पाटील यांच्या घरी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वनपर विचारपूस केली.