
सांगली, ता.२८ : सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई या कारवाईत एम डी ड्रग्ज व ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर छापा मारण्यात आला असून या छाप्यात तयार ड्रग्ज, कच्चामाल, साहित्य,उपकरणे आणि कार असा एकूण २९ कोटी ७३ लाख ५५ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सोमवार (ता.२७) रात्री विटातील कार्वे एमआयडीसी रामकृष्ण हरी इंडिस्ट्रीज एम डी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर करण्यात आली. या कारवाईत अटक करण्यात आलेले संशयित आरोपीचे १) रहुदिप धानजी बोरिचा, वय ४१ वर्ष, रा. श्री रेसेडेन्सी, ररुम नं २२, उत्तीयादरा कोसंबा, ता.भरुच, जि. सुरत राज्य गुजरात २) सुलेमान जोहर शेख, वय ३२ वर्ष, रा. मौलाना दादा लेन, दर्गाह गल्ली, बांद्रा, वेस्ट मुंबई) ३) बलराज अगर कातारी, वय २४ वर्ष, रा. साळशिंगे रोड, आयटीआय कॉलेज जवळ, विटा असे आहे. यातील रहुदीप बोरीचा हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. याबाबत विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, नशिले पदार्थ विक्री, निर्मिती, साठा, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते. पथकाला कार्वे (ता. खानापूर) येथील औद्योगिक वसाहतीत रामकृष्ण हरी माऊली या कारखान्यात एमडी ड्रग्जची निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली. दिलेल्या माहितीने सोमवारी मध्यरात्री पथकाने छापा टाकला. या छाप्यात कारखान्यात तयार एमडी ड्रग्ज, कच्चा माल व माल तयार करण्यासाठी लागणारे अन्य साहित्य आणि एका कारमधील (एमएच ४३ ए एन १८११) ड्रग्ज असा एकूण २९.७३ कोटींचा माल जप्त केला. यावेळी तीनही संशयितांना ताब्यात घेऊन माल व आरोपी यांना पुढील तपासकमी विटा पोलीस ठाण्याचा ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास विटा पोलीस करीत आहे.
सदर कारवाई कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाने एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, विट्याचे निरीक्षक धनंजय फडतरे, सिकंदर वर्धन, अच्युत सुर्यवंशी, सागर टिंगरे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, सागर लवटे, अनिल कोळेकर, उदय साळुंखे, नागेश कांबळे, संजय पाटील, अमर नरळे, सतिश माने, महादेव नागणे, संदीप नलवडे, उदय माळी, विक्रम खोत, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, गणेश शिंदे, वनिता चव्हाण, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.