
मिरज, ता.२८ : येथे किरकोळ कारणावरून गोळीभार. मिरजेतील इसापूर गल्लीत दोन गटात राडा, देशी गावटी पिस्तूलने हवेत दोन गोळ्या झाडल्याची घटना (ता.२७) रात्री घडली. सदर प्रकरणी मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दस्तगिर शौकत बावा, जुलीकर बावा असे गोळीभार करणाऱ्या दोन संशयिताचे नावे आहेत.
याबाबत मिलींद विलास पाटोळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुदैवाने या गोळीभारात
कोणतेही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी मिरज पोलिसांनी एका संशयितास देशी गावटी पिस्तुलसह ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.