
सांगली, दि. २७ : केंद्रीय सैनिक बोर्ड नवी दिल्ली यांच्या मार्फत राज्यातील राज्य सैनिक बोर्ड / जिल्हा सैनिक बोर्ड या ठिकाणी माजी सैनिकांना स्पर्श प्रणालीत (Sparsh Portal) येत असलेल्या अडचणीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) स्थापन करण्याबाबत कळविले आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी सैनिकांना डिजीआर द्वारे मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील केंद्र चालवण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी सैनिकांनी डिजीआर वेब साइट
वर दिनांक 30 जानेवारी 2025 पर्यंत नोंदणी करून जिल्हा सैनिक कार्यालयास कळविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.