सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी ३ फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली, दि. २७ : सेवा सहकारी संस्थांना कामे वाटपासाठी वाहनचालक व शिपाई प्रत्येकी एक काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. ही कामे करण्यास इच्छुक असणाऱ्या तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्र व आवश्यक कागदपत्रासह दि. ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.


जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडील वाहनचालक व शिपाई प्रत्येकी एक काम असून कामाचा कालावधी ११ महिन्याचा आहे, तर मासिक मानधन वाहनचालकासाठी १३ हजार रूपये व शिपाई कामासाठी ११ हजार ५०० रूपये इतके आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button