सांगली : प्रतिनिधी

सांगली, ता.२७ : बस स्टॅंड जवळ मोबाईल शॉपितिल कामगाराचा सकाळी ११ च्या दरम्यान भरदिवसा निर्घृण खून करण्यात आलेची घटना (ता.२६) घडली आहे. हा खून शंभर रुपयांचे स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाचा निघृण खून करण्यात आला. सदर घटना श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानात घडली. स्क्रीन गार्ड देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोयात्याने सपासप वार करत खून केला. निर्घृण खून झालेल्या तरुणाचे नाव विपुल अमृत पुरी गोस्वामी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधिकक्ष रितू खोखर, उपविभागीय अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. अवघ्या काही तासातच पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले.