
खटाव, ता.२५ : ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज धारा तीर्थयात्रा मोहिमेसाठी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सरपंच रावसाहेब बेडगे यांच्याकडून शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संभाजी भिडे गुरुजी कडून खटाव गावातील तरुणांना ७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी पर्यंत धारातीर्थ मोहिमेसाठी गावातील शेकडो युवकांना सहभाग होण्यास आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी गड किल्ल्यांचा संरक्षण करण्यासाठी व महाराजांचा पराक्रम इतिहास पाहण्यासाठी युवकांनी सहभागी व्हावे असे गुरुजी म्हणाले. यावेळी सरपंच रावसाहेब बेडगे, महादेव घोरपडे सरकार सदस्य, संजय कागवाडे, संभाजी जाधव, विशाल जाधव, सुरेश परीट, सोमलिंग पुजारी, पत्रकार सुभाष तेली गावातील नागरिक उपस्थित होते.