
शिरगाव, ता.२५ : डॉ. प्रताप ( नाना) पाटील अध्यक्ष सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी तासगाव तालुक्यातील शिरगावच्या उरूसा निमित्त भव्य कुस्तीचे आयोजन केले. एक लाख असे भव्य पारितोषिक कुस्ती स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेले. यावेळी कुस्ती मैदानामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना बोलून त्यांनी मान सन्मान केला.
कुस्ती मैदानाचे आयोजन केल्याबद्दल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या कडून नानांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा. मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचा सत्कार सांगली जिल्हा शहर अध्यक्ष श्री. पद्माकर जगदाळे सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री शंकर बापू गायकवाड, मार्केट कमिटीचे संचालक श्री जीवन पाटील, मिरज तालुका अध्यक्ष श्री देवजी नाना साळुंखे, मा जिल्हा परिषद सभापती श्री सुनील भैया पवार, इस्लामपूर तालुका अध्यक्ष श्री केदार दादा पाटील, कडेगाव तालुका अध्यक्ष श्री कृष्णकांत मोकळे सर, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील, वंजारवाडी गावचे सरपंच श्री अरुणजी खरमाटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.