कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड ता.२५ : आवधुत कॉलनी येथे निरंजन शेडबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार (ता.२२) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्ताचा तुटवडा असल्याने व ‘ रक्त दान हेच श्रेष्ठ दान या वाक्याची संकल्पना जपत, सामाजिक कार्य म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर, माजी नगरसेवक शेडजी मोहिते व दलीत महासंघाचे उत्तम मोहित हे उपस्थित होते. कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिपक भांडवलकर यांनी रक्तदानाचा हक्क बजावला. या रक्तदान शिबिरास जवळपास चाळीसच्या वर रक्तदात्यांनी रक्तदान केले. कुपवाड, बामणोली, आवधुत कॉलनीतून रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला.
शिबिराचे आयोजक मधुकर शेडबाळे शिबीर प्रसंगी बोलताना म्हणाले की, आजचे सर्वात श्रेष्ठ दान हे रक्तदान आहे. रक्ताचा तुटवटा पण आहे. मी रिक्षा चालवतो मी बरेच रुग्णालयात पेशंट्ना रुग्णालयात सोडले आहे. माजी रुग्णालयात ये-जा असल्याने मला माहीत झाले की, रक्ताची गरज बऱ्याच जणांना भासत आहे. यापुर्वी मी बऱ्याच वेळा रक्तदान केले आहे. हया सर्व गोष्टी पाहता मी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यामुळे सामाजिक कार्यात थोडीसी मदत होऊल हे शिबीर करण्याचे योजले
या शिबिराचे आयोजन मधुकर शेडबाळे, राजन कदम प्रहार जनशक्ती पक्ष व ओन्ली टायगर रिक्षा मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले.