
मिरज, ता.२४ : येथे कृषीऑफिसात ३५ वर्षपूर्वीचे जुने रेकॉर्ड जतन करण्यासाठी अधीकारी लागले कामाला. मिरज तालुका कार्यालयात जुने रेकॉर्ड व्यवस्थित रहावे या हेतूने मिरज तालुक्यातील सर्वच अधिकारी हे गेल्या दोन दिवसापासून ऑफिस मधील सर्व दप्तरे व्यवस्थितपणे राहावे यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासून कोणत्याही काम न करता 35 वर्षापूर्वीचे जुने रेकॉर्ड व्यवस्थित राहण्यासाठी अधिकारी कामाला लागले असून सर्व अधिकारी प्रयत्न करत आहे. तर रेकॉर्ड पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर अधिकाऱ्यांना आपले काम पाहण्यासाठी भागात शेतकऱ्यांचे कामे बघण्यासाठी पाठवणार असल्याची माहिती दिली आहे. एरवी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सतत वर्दळ असायचे दोन दिवस झाले कृषी विभागातील सर्वच अधिकारी रेकॉर्ड व्यवस्थित करण्यात व्यस्त आहे. कृषी अधिकारी ने सामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत असे नागरिकांची मागणी आहे.