मिरज : प्रतिनिधी

खटाव, ता.२३ : खटाव ग्रामपंचायत व नेत्र रुग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया करणे बाबत ग्रामपंचायत मध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन विद्यमान सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. खटाव गावातील ज्येष्ठ नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया बाबत तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले. गावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी सरपंच रावसाहेब बेडगे, ग्रामसेवक संजय गायकवाड पत्रकार परशुराम बनसोडे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.