
अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. अभिनेत्यावावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सैफ अली खान यांच्या वांद्रेतिल घरात चाकूने हल्ला करण्यात आला आहे. मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान झाला आहे. चोर आणि सैफ अली खान यांच्या झटापटीत सैफ अली खानवर सहा ते सात चाकूचे वार झाले आहेत. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याला शरीरावर सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत, त्यामधील दोन जखमा अतिशय खोलवर असल्याचे समजतेय. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफ अली खान याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आलेली आहे. सैफ अली खान याच्याकडून चाहत्यांना संयम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.