मिरज / प्रतिनिधी

भोसे ता.१७ : येथे गणेश मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला संगीत भजनी मंडळ यांच्यामार्फत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंचपदी तसेच भक्ती गीते सादर करण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महिला संगीत भजनी मंडळ यांचे मार्गदर्शक तसेच ज्येष्ठ संगीत शिक्षक माननीय श्री.सदाशिव कुंभारसर, श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती प्रभावती कुंभार, हार्मोनियम वादक सौ. सुमती कुंभार, तबलावादक श्री बबन कुंभार, आशाताई कुंभार, तसेच इतर गायक कलाकार श्री संदीप कुंभार, सौ सुवर्णा कुंभार, सौ सुमन कुंभार, सौ अश्विनी कुंभार, सुलाताई कुंभार, अक्कताई लोहार इत्यादी कलाकारांनी आपली कला सादर केली. सदर कार्यक्रमांमध्ये गणेश भक्त, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.