मिरज / प्रतिनिधी

खटाव ता.१५ : मिरज तालुक्यातीत खटाव येथे मकर संक्रांतीचा उत्साहात साजरी. खटाव गावचे ग्रामदैवत श्री सोमेश्वर व आमोघसिद्ध दोन्ही देवाला साखर वाढवून नागरिक ऐक मेकांना साखर व तिळगूळ देऊन गोड गोड बोला असे शुभेच्छा देऊन वेगळ्या पद्धतीने व मोठया उत्साहात आणि फटाक्यांच्या अतिषबाजीत साजरा करण्यात आला. गावातील नागरिकांनी देवाला साखर वाढवून ऐकमेकाना साखर वाटप केले. या साखर वाटपात गावात 200 क्विंटल पेक्षा जास्त साखर वाटप करण्यात आले.
प्रत्येक वर्षी मकर संक्रात सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . यावर्षी सुद्धा मकर संक्रात हा सण तीन दिवस साजरा करण्यात आला. (ता.१३) भोगी या दिवशी भाजी-भाकरीचा (बाजरी) नैवेद्य देवीला दिला. संक्रातीच्या दुसऱ्या (ता.१४) पुरणपोळीचा देवाला व देवीला नैवेद्य दाखविला जातो.
याच दिवशी खटाव गावातील श्री सोमेश्वर व अमोगसिद्ध देवाची पालखी कृष्णा नदीमध्ये स्नान करण्यासाठी व कर्नाटकातील ऐनापुर येथील श्री सिद्धेश्वर देवाची भेट घेण्यासाठी खटावपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ऐनापुर या गावाकडे पालखी जातात. येथे श्री सिद्धेश्वर देवाची आणि वेगवेगळ्या सुमारे ११ देवाची भेट घेऊन कृष्णा नदीवर जातात. कृष्णानदीवर दोन्ही देव स्नान करून पुन्हा रात्री खटाव गावातील श्री सोमेश्वर मंदिराकडे येतात. त्यानंतर क्रिकांत या दिवशी सोमेश्वर व अमोघसिद्ध दोन्ही देवाची पालखी संध्याकाळी सोमेश्वर मंदिरातून गावातील सोमेश्वर मंदिरापर्यंत भव्य दिव्य आतिषबाजीत व पारंपारिक ढोल वाद्यात पालखीचे भव्य मिरवणूक काढण्यात आली.