
मिरज / प्रतिनिधी

आरग ता.१२ : येथील पद्ममावती मंदिरातील देवीचे दागिने चोरी करणारा सराईतास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले जेलबंद. अक्षय मोरे, वय २७ वर्ष, रा.गोंदीलवाडी रेल्वेगेट पलूस आमणापुर रोड, ता.पलूस, जि. सांगली असे जेलबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ९ लाख ५४ हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. यामध्ये १) ७ लाख ४९ हजार ४०० रु. किंमतीचे १०६ ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण, डोर्ले, २) १ लाख ४० हजार रु. किंमतीचे दीड किलोचे चांदीचे ३ मोठे हार व मेखलाजू , ३) ६५ हजार रु. किंमतीची बजाज पल्सर दुचाकी असा हा एकूण ९ लाख ५४ हजार रु. किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार चार दिवसांपूर्वी (ता.८)आरगमधील पद्ममावती मातेच्या मंदिरातील वरच्या बाजूचा बंद दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून मंदिरातील देवीच्याअंगावरील सोन्या-चांदीचे दागिन्यांची चोरी केली होती. याबाबत शितल आण्णासो उपाध्ये वय ६० वर्ष, रा. महावीर चौक, आरग, ता. मिरज, जि. सांगली यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली होती. त्या आनुशंगाणे सदर गुन्हाची सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आरगमधील पद्मावती मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेशित केले. त्या आदेशाने स्था.गु.अ शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्था.गु.अ. शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचा स्टॉपमधील पथकाची नियुक्ती केली.
सदर पथकातील सपोनि / पंकज पवार यांना (ता.१२) रोजी बातमी मिळाली की, पद्मावती मंदिरातील चोरी करणारा सराईत सोने-चांदीचे दागिने विक्रीसाठी पाचवा मैल, पलूस रोड परिसरात मोटासायकलवर येणार असल्याचे त्या मिळालेल्या माहितीने सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय मोरे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती केली असता त्याच्या सॅकमध्ये सोन्या-चांदीची दागिने मिळून आले. या दागिन्यांची विचारपूस केली असता हे दागिने आरग मधील पद्मावती मंदिरातील चोरल्याचे त्याने कबुली दिली. पुढील तपास कामी आरोपी व मुद्देमाल मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. अक्षय मोरे हा सराईत आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी पलूस व विश्रामबाग पोलीस ठाण्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.
सदर कारवाई सपोनि/ पंकज पवार, सपोनि/ नितीन सावंत, दरिबा बंडगर, सतिश माने, महादेव नागणे, अनिल कोळेकर, सागर लवटे, संदिप गुरव, नागेश खरात, अमर नरळे, मच्छिंद्र बर्डे, सागर टिंगरे, संदिप नलावडे, उदयसिंह माळी, विक्रम खोत, कॅप्टन गंडवाडे, विवेक साळुंखे, विजय पाटणकर सायबर पोलीस फेली.