
आरग ता.१२ : येथील लक्ष्मीवाडी महालक्ष्मी मंदिराच्या दानपेटीतील रोक रक्कम व देवीच्या दागिन्यावर चोरट्याने मारला डल्ला. सदर घटना (ता.११) रात्रीच्या दरम्यान घडली आहे. आरगेतील लक्ष्मीवाडी येथील लक्ष्मी मंदिराचा मुख्य दरवाजास असणारे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश करून देवीचे दागिने व दानपेटी मधील रक्कम चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. ही बातमी समजताच गावकऱ्यांची घटनास्थळी धाव घेतली. सदर चोरीचा प्रकार कळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक व मिरजेचे डीवायएसपी प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिरातील देवीचे दागिने व दानपेटीतील रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांच्या छडा लावून त्यांना तात्काळ पकडण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आले.
सदर घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आले असून संशयित अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.