कुपवाड / प्रतिनिधी

कुपवाड ता.११ : शिवनेरीनगर येथे चौसष्ट वर्षीय वृध्द महिलेचा ओढ्यातील नाल्याच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव कमल जगन्नाथ कदम (वय ६४ वर्ष, रा. शिवनेरीनगर, कुपवाड ता.मिरज, जि. सांगली) असे आहे. सदर घटना आज सायंकाळी पाचच्या दरम्यान घडलेले आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद करण्यात आले असून सदर घटनेची फिर्याद मयत कमल कदम यांची सून राणी अमृत कदम, (वय ३० वर्ष रा. शिवनेरीनगर, कुपवाड) यांनी दिली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कुपवाड पोलीस धाव घेवून प्राथमिक तपास करून मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवले आहे. सदर घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.