
बुधगाव / प्रतिनिधी

बुधगांव ग्रामपंचायतीच्या वतीने आज स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊयांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून (ता.१३) ग्रामीण भागातील पत्रकारांचा सन्मान बुधगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वैशाली पाटील, जयश्री पाटील, सपना गोसावी, माजी उपसभापती विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या जयंतीनिमित ह.भ.प आंदोजी महाराज यांचे स्वामी विवेकानंद यांच्या जीवन अधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, माजी उपसरपंच श्रीकांत पाटील, पांडुरग साळुंखे, बाबुराव तडसरे गुरुजी, श्रीकांत नांद्रेकर, सुधीर पुराणिक, संतोष कुलकर्णी, सुधीर दातार, बजरंग भगत, महादेव शिंदे, संभाजी पाटील, पत्रकार सतिश पाटील, सचिन सुतार , संजय गायकवाड, धनंजय गायकवाड, गजानन भगत, राधिका शिंदे, श्रीकांत यमगर, महेश भिसे , यांच्यासह पत्रकार व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर पाटील सर यांनी केल.