कुपवाड / प्रतिनिधी

कुपवाड शहरातील बजरंगनगर, शरदनगर, श्रीनगर, चैतन्यनगर व औद्योगिक वसाहतीकडे जाणारा वनविभागा समोरील मुख्य रस्ता खराब असून रस्त्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या रस्ताची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी मंगळवार (ता.7) रोजी शिवसेना उबठा गटाच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर व शहर अभियंता अशोक कुंभार दोघांनी यांनी आंदोलनस्थळी धाव देऊन येत्या आठ दिवसात तातडीने बैठक घेऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यावर आंदोलनकर्ते म्हणाले की, जर येत्या आठ दिवसात रस्ताचे प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला.
याावेळी शिवसेनेचे शहर उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, शहरप्रमुख सुरेश साखळकर, विठ्ठलराव संकपाळ, महादेव मगदूम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.