मिरज / प्रतिनिधि

मिरज-पंढरपूर रस्ता, तानंग फाटा येथे रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ बस आणि ट्रकचा भीषणअपघात झाला. हा आपघात मंगळवार (ता.७) रोजी झाला असून सुदैवाने यात कोणतेही जिवीतहानी झालेली नाही. या आपघातात एकूण १९ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून जखमी झालेले प्रवाशांमध्ये कवठेमंकाळ शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांच्याही ही समावेश आहे. ही माहिती समजताच घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीसांनी धाव घेतली.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, एसटी बस सांगलीकडून जतच्या दिशेने जात असताना नांदेड कडून मिरज मार्गे कुपवाड एमआयडीसी कडे जाणाऱ्या ट्रकने तानंग फाटा येथे एसटी बसला जोराची धडक दिली. या धडकेत बसमधील विद्यार्थ्यासह १९ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. जखमी प्रवाशांना मिरज शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. या अपघातमध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी बस व ट्रक ताब्यात घेतली असून अधिक तपास मिरज पोलीस करीत आहे.