कुपवाड / प्रतिनिधी

कुपवाड, ता.६ : कुपवाड शहर संघर्ष समिती, कुपवाड व्यापार संघटना, कुपवाडमधील लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यावतीने सांगली मनपाकडून आकरण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कराच्या निषेधार्थ सोसायटी चौक, कुपवाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळीं महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढीव मालमत्ता कर आकारणीबद्दल निषेध करण्यात आला.

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी फोन वरून संपर्क साधला…….

या रास्ता रोको आंदोलनात भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष मा.प्रकाश ढंग, शेडजी मोहिते, गजानन मगदूम, विजय घाडगे, प्रशांत पाटील, कल्पना कोळेकर, अय्याजभाई नायकवडी, राजेंद्र कुंभार, संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, अनिल कवठेकर, उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, मोहन बापू जाधव, प्रवीण कोकरे, विश्वजीत पाटील, पै. सुभाष गडदे यांनी सहभाग घेऊन मनोगत व्यक्त करून वाढीव मालमत्ता कर आकारणीला विरोध दर्शिवला. सदर रास्ता रोको आंदोलनात कुपवाड व्यापार संघटना, संघर्ष समिती, कुपवाड मधील लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी व कुपवाडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.