
कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड, ता.३ : येथे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध किर्तन महोत्सव म्हणुन परिचीत असणाऱ्या कुपवाडमध्ये सालाबादप्रणाने या वर्षी रंगणार तीन दिवसांचा भव्य किर्तन महोत्सव सोहळा. हे किर्तन महोत्सव पाच जानेवारी ते सात जानेवारी या तीन दिवसात पार पडणार आहे. अशी माहिती माजी नगरसेवक गजानन मगदुम यांनी दिली. किर्तन महोत्सव कुपवाडचे माजी नगरसेवक गजानन मगदुम यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने दरवर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. गेले नऊ वर्ष हा किर्तन महोत्सव सोहळा पार पडत आला आहे. यंदाचे हे दहाव्ये वर्ष आहे.
हा महोत्सव कुपवाडमधील अकुज ड्रीमलँडच्या मैदानावर ‘गजर कीर्तनाचा सोहळा विठ्ठल भक्तांचा ‘ कुपवाडकरांना पहायला मिळणार आहे. रविवार पाच ते सात जानेवारी या कालावधीत रात्री ८ ते १० या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिध्द असे तीन दिवस तीन कीर्तनकारांचे कीर्तने होणार आहेत.

कीर्तन महोत्सवाची तयारी नियोजन सुरू असुन कीर्तनाचे संयोजन श्री ग्रंथराज ज्ञानेशवरी पारायण सोहळा समितिने केले आहे.
या किर्तनास महिला व पुरुष यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असुन गतवर्षीचा अनुभव पाहता यावेळी दहा हजार नागरिक या किर्तन सोहळ्याचा आनंद घेणेसाठी कुपवाड नगरीत येतील असा विश्वास शिवप्रेमी मंडळाच्या पदाधिकार्यांना आहे. या किर्तन सोहळ्याचे नुकतेच जाहिरात कमान व व्यासपिठ उभारणी कामाचा शुभारंम गावातील जेष्ठ नागरिक व श्री ग्रंथराज पारायण सोहळा समिती सदस्य यांच्या उपस्थित झाला.

याबैठकीस माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्यासह ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष शिवगोंडा पाटील, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, दादासो पाटील, राजेंद्र पाटील, रामकृष्ण महाराज खाडे बाळासाहेब पाटील, गंगाधर पाटील, राहुल कोल्हापुरे कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विजय खोत, अरुण रुपनर,अजय माने, कल्लाप्पा कोरे,भाऊसाहेब पाटील, सी.आर.पाटील, बापुसो खांडेकर, सतीश पाटील, नितीन कारंडे, योगेश हिंगमिरे,कलाप्पा कोरे कल्लापा हलींगळे, किशोर शितोळे, भास्कर जमदाडे, महादेव कोरे, बापुसो तोडकर, कल्लापा सायमोते, हनमंत सरगर, नितीन कांरडे, शिवप्रेमी मंडळ व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.