कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड, ता.२ : तानंग फाटा येथे गायींना कत्तलिसाठी नेणारी मालवाहतूक कुपवाड पोलिसांनी पकडली. पकडण्यात आलेल्या अशोक लेलँडचा गाडी क्रमांक MH 09 CU 9522 हा असून या मालवाहतूक गाडीत दहा मोठी गाय व पाच लहान गाय दोरीने बांधलेले दिसून आल्याने वाहतूक करणारे संशयित आरोपी मेहबूब हुसेन जातकर वय २४ वर्ष, सद्दाम अमीन साहब शेख वय २४ वर्ष, दोघेही रा.कृष्णा घाट रोड, मिरज या दोघांवर कुपवाड पोलिसांत महाराष्ट्र पशु संरक्षण व पशु प्राणी छळ या कायदेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार कुपवाड एम.आय.डि.सी रोड तानंग फाटा येथे चौबाजूनी हौदा ताडपत्रीने दोरीने बांधुन पॅक असलेल्या अशोक लेलँड मालवाहतूक गाडीत दहा मोठी गाय व पाच लहान गाय असे एकूण पंधरा जणांवरे गाडीत दोरीने बांधून त्यांना चारापाणी न घालता कत्तल करण्याच्या उद्देशाने मालवाहतूक गाडीतून वाहतूक करत असताना कुपवाड पोलिसांनी मालवाहतुकीस पकडुन त्यातील गायींना मुक्त करून वाहतुक करणारी दोन संशयित इसम मेहबूब हुसेन जातकर व सद्दाम अमीन साहब शेख या दोघांवर गुन्हा कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.