
कुपवाड : प्रतिनिधी
कुपवाड,ता.१:-सर्वसामान्य उद्योजक हा वित्तीय संस्थेकडून होणाऱ्या वित्त पुरवठ्यावर अवलंबून असतो. तो एकाच वेळी कर्ज घेऊन उद्योग उभारणी करत नसतो. जस-जशी गरज लागते त्या वेळी उद्योजकांस कर्ज उभारणी करावी लागते. कर्जदारास/उद्योजकास कर्ज घेते वेळी सिबील बाबत विनाकारण अडचणीना सामोरे जावे लागत आहे तरी त्यामध्ये बदल करण्यात यावे याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना निवेदन दिल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू संचालक हरिभाऊ गुरव यांनी दिली.

