
नव्या वर्षाच्या सुरवातीस सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक जानेवारीच्या पहिला दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. एक जानेवारीपासून तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली. मागील काही महिन्यापासून व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. पण नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करण्यात आली.नववर्षानिमित्त देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी व्यावसायिक सिलिंडर १४:५० रुपयांनी कमी झाला आहे. घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल झाला नाही. घरगुती सिलेंडरचा दर मागील आठ महिन्यापासून स्थिर आहेत.