
बुधगाव, ता.४ : ग्रामपंचायतच्या वतीने नववर्षानिमित्त (ता.१ ) जानेवारीला माजी वसुंधरा अभियानांतर्गत बुधगाव गावामध्ये जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत गावामध्ये पर्यावरण पूरक, वृक्ष लागवड, प्लॅस्टिक मुक्ती, पाणी वाचवा, कापडी पिशव्यांचा वापर, सेंद्रिय शेतीचा वापर, स्वच्छता आधी उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवले जाणार आहेत. तरी या अभियानात बुधगाव मधील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन बुधगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ वैशाली विक्रम पाटील यांनी केले.

या अभियानामध्ये बुधगाव ग्रामपंचायतचे सदस्य मनोहर पाटील, जयश्री पाटील, शुभांगी कोळी यांनी सहभाग घेतला. हे अभियान यशस्वी करण्यासाठी वसंतदादा हायस्कूल आदर्श विद्यालय चे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी विशेष सहभाग घेतला. यावेळी मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री विक्रम पाटील संभाजी पाटील व बुधगाव ग्रामस्थ आदी उपस्थित होते.