कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये कार्यशाळा संपन्न

कुपवाड : प्रतिनिधी
कृष्णा व्हॅली चेंबर आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चरल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. सदर सेमिनारमध्ये या विषयातील तज्ञ हरिष पाल यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे संचालक अरुण भगत, नितीश शहा, दिनेश पटेल उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाल म्हणाले की, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस हा एक मोठ आणि बोलक व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर गव्हर्नमेंट सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या/उपक्रम आणि विविध सेवा विभाग नामांकित आहेत. त्यामुळे उद्योजकांनी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस या साईट वर आपले रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला उत्पादित केलेला माल आणि विविध सेवा या गव्हर्नमेंटच्या विविध कंपन्यांना तसेच विविध विभागांना विकता येतील. उदा. पूर्वी कंपनीच्या मालकाला आपला माल किवा सेवा विक्री करता देशाच्या विविध भागात जाऊन ग्राहक शोधणे अतिशय किचकट काम होते पण आता हेच सर्व gavt कंपन्या आणि उपक्रम आणि त्यांची माहिती त्यांना पाहिजे असलेली उत्पादन आणि सेवा या सर्व बाबीचा समावेश हा गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस या साईटवर ग्राहकांना एका बटणाच्या क्लिकवर मिळून जाईल.
तरी आता सर्व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनि या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे हे त्यांच्या भविष्यातील उद्योग वाढीसाठी फायद्याचे आहे. गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस रजिस्ट्रेशन हे पूर्णपणे मोफत आहे. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी उद्यम सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महेश काबाडी, उद्योजक फुलचंद शिंदे, शाकीब मुल्ला, अशोक दिपू, उपेन पटेल, विजय भंडारे, अनिल कांबळे, सुनील पवार, मोहमद बोलबंद व्यवस्थापक अमोल पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.