कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड ता.२० : अहिल्यानगर येथील नवजीवननगर परिसरात विधानसभा निवडणुकीच्या राजकीय प्रचाराच्या वादातुन मंगळवारी (ता.19) रोजी दोन गटात तुफान राडा. दोन गट एक-मेकास भिडले ,चाकू, काठी, लोखंडी रॉडने हल्या करण्यात आला. या हल्ल्यात माजी उपमहापौर विजय घाडगे यांच्यासह दोन्हीही गटातील तेराजण जखमी झाले. काँग्रेस आय व अपक्ष उमेदवारांचे हे दोन गट असून याप्रकरणी कुपवाड पोलिसांत दोन्ही गटाने परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या.
या हल्ल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांत एकूण बावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावरच प्रकार घडल्याने वातावरण तापले.
यात गुन्हा दाखल झालेले संशयित श्रीकांत गोसावी उर्फ जाधव, रफिक शेख ,भोराप्पा आमटे ,आकाश गोसावी , चिच्या उर्फ सिकंदर शेख, किरण पाटील, अब्बास शेख, अमीन शेख, धनाजी बुधनुर (रा. सर्व अहिल्यानगर ) अशी संशयितांची नावे आहेत. तर दुसऱ्या काँग्रेस आय गटातील माजी उपमहापौर विजय घाडगे, पवन घाडगे, सागर घाडगे, शुभम गोसावी , शफिक शेख, अभिषेक गोसावी, महबूब नदाफ, तोफिक मुल्ला, वाजीद मुलाणी ,पिराजी गोसावी ,सचिन घाडगे ,सुनील घाडगे , शामराव घाडगे (सर्व रा. अहिल्यानगर कुपवाड) यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रचाराच्या धामधुमीत अहिल्यानगर भागात काँग्रेस व अपक्ष उमेदवाराचा प्रचार सुरु असताना मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. माजी उपमहापौर घाडगे यांनी नवजीवननगर भागात श्रीकांत गोसावी उर्फ जाधव यांच्या घरासमोर जाऊन श्रीकांत जाधव ,रफिक शेख, भोराप्पा आमटे यांना 'तुम्ही आमच्या लोकांच्या गाड्या अडवून त्यांना दमदाटी का करता.? अशी विचारणा केली. संशयित श्रीकांत जाधव याने याचवेळी आम्ही जयश्री पाटील यांचा प्रचार करतोय. त्या निवडून आल्या नाहीत तर तुम्हाला व तुमच्या कार्यकर्त्यांना बघून घेतो. धमकी देत श्रीकांत जाधव यांनी नऊ साथीदारांना सोबत घेऊन घाडगे व त्यांच्या सहकाऱ्याना काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार करीत आहेत, याचा राग मनात धरून हाताने, काठी, लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच चाकूने, हातावर मारून जखमी केले. तशी तक्रारही घाडगे यांनी दिली.
.... दुसऱ्या गटात श्रीकांत गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, माजी उपमहापौर विजय घाडगे यांनी गोसावी यांच्या घराजवळ येऊन अपक्ष उमदेवार जयश्री पाटील यांचा प्रचार करायचा नाही. तुम्ही पृथ्वीराज पाटील यांच्या हात या चिन्हाचाच प्रचार करायचा. असे म्हणाले. तेव्हा गोसावी यांनी नकार दिल्यानंतर संशयित घाडगे व त्यांच्या साथीदारांनी श्रीकांत गोसावी व त्यांचा भाऊ आकाश गोसावी व सहकाऱ्यांना हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच अभिषेक गोसावी यांनी फिर्यादी यांचा मित्र प्रशांत यादव यास पाठीत चाकूने मारून जखमी केले. दोन्हीही गटातील जखमीवर सांगली येथील शासकीय, खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अधिक तपास उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे करीत आहेत.