मिरज | प्रतिनिधी

मिरज : भीम प्रेरणा मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने बालक दिन मोठ्या उत्साहात साजरा १४ नोव्हेंबर २०२४ रोजी बालक दिनानिमित्त संस्थेच्या वतीने नरवाड बेडग ढवळी व बोलवाड या गावांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बालक दिनानिमित्त गुलाब पुष्प व खाऊ वाटून बालक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजीत मोहन कांबळे, उपाध्यक्ष प्रवीण गोपाळ सरवदे, खजिनदार श्रीकांत लक्ष्मण कोळी, सामाजिक कार्यकर्ते सागर माळी, सुरेश हक्के तसेच नरवाड गावचे कृष्णा गोविंद सपकाळ व निकिता शिंदे तसेच ढवळी गावचे संजय मगदूम, गणपती कोळी तसेच प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.